top of page
Writer's pictureSayali Kanchan

महाराष्ट्र सरकारच्या घरगुती सोलार संबंधित योजना.

Updated: Apr 16, 2023



दर महिन्याला लाइटबिल भरन्यासाठी तुम्हालाही काटकसर करावी लागते का? पण तुमची हि काटकसर थांबवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे तो म्हणजे सौरऊर्जा! एक वेळची गुंतवणूक आणि पुढचे २५ वर्ष तुम्हाला लाइटबिल ची काळजी करण्याची गरज नाही. आणि ह्या संगळ्यासाठी महाराष्ट्र सरकार तुम्हाला खूप साऱ्या योजना आणि सुविधा हि पुरवत आहे. सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंग च्या संकटमुळे महाराष्ट्र सरकार ग्रीन एनरजी ला खूप प्रोत्साहन देत आहे. सौरऊर्जा निर्मितीच्या बाबतीत महाराष्ट हे भारतातील चौथ्या क्रमांकाच राज्य आहे. ३१ मार्च २०२५ पर्यन्त १२.९३ Gigawatt सौरऊर्जा निर्माण करण्याच महाराष्ट सरकारच ध्येय आहे. यापैकी २ Gigawatt हे ग्रिड कनेक्टेड रूफटॉप सोलार पासून करण्याचे उद्दिष्ट आहे.महाराष्ट्र सरकारचे विविध अक्षय ऊर्जा स्रोतरांचे प्रकल्प आणि त्याची क्षमता खालीलप्रमाणे दिली आहे.

योजना

क्षमता (प्रती मेगावॅट)

१) सौरउर्जेपासून वीजनिर्मिती प्रकल्प

१००००

२) ग्रिड कनेक्टेड रूफटॉप सोलार प्रकल्प

२०००

३) शासनाचे विविध अभियान, ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौरउर्जेद्वारे कार्यान्वित करणे

५००

४) लघुजल व नळ पाणीपुरवठा करण्यासाठी सौरपंपाचा वापर करणे

३०

५) ग्रीड जोडलेले सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले शेतकरी सहकारी संस्था/कंपन्या/गट प्रदान करून खाजगी गुंतवणूक करून सौरप्रकल्प विकसित करणे

२५०

६) सौर /पवन ऊर्जा आधारीत विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी एनर्जी स्टोअरेर्ज व्यवस्था विकसित करणे.

५०

७) सौर ऊर्जेवर आधारीत असलेले ई-वाहन चार्जिंग स्टेशनची उभारणी करणे.

५०

८) महाऊर्जाच्या स्वत:च्या र्जागेवर सौर / पवन सौर-संकरीत पारेषण ऊर्जा प्रकलप तयार करणे.

५०

अशा प्रकारे एकूण १२.९३ gigawatt ऊर्जेची क्षमत असलेले प्रकल्प निर्माण करण्याचे महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट आहे.


सौरऊर्जेचे सगळे प्रकल्प MEDA (Maharashtra Energy Development Agency) च्या अंतर्गत होणार आहेत.महाराष्ट्राची खेडी विकसित व्हावी आणि तिथे विजेचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी सरकारने विशेष ‘सुकाणू अभिकरन’ हि योजना आणली आहे.३१ मार्च २०२५ पर्यन्त महाराष्ट्र सरकार रूफटॉप सोलार साथी ४०% इतकी सबसीडी देत आहे.हि रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे तुमच्या बँक खात्यात जमा होईन.आणि जर तुमचा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण नाही झाला तर तुम्हाला एक वर्षाची मुदतवाढहि मिळू शकते.तुम्हाला ह्या प्रकल्पा अंतर्गत ग्रिड कनेक्टीवीटी व नेट मिटरिंगची हि सुविधा उपलबद्ध करून देण्यात येते.


ग्रिड कनेक्टीवीटी म्हणजे तुमची रूफटॉप सोलार सिस्टम तुम्ही ग्रिडला कनेक्ट करू शकता. नेट मीटरिंग म्हणजे तयार केलेली ऊर्जा स्ववापरासाठी वापरली जाते.आणि अधिक असलेली ऊर्जा नेट मिटर द्वारे ग्रिड ल निर्यात केली जाते. जर कुठल्याही कारणाने भविष्यात तुम्हाला विजेची गरज पडली तर तुम्ही निर्यात केलेली ऊर्जा ग्रिड मधून परत आयात करू शकता. नेट मिटर हा दोन्ही दिशांमद्धे काम करून बिलिंगची नोंद करतो.उदाहरणार्थ, डिसेंबरमध्ये जर माझ्या विजेचा वापर 40 युनिट्सपेक्षा जास्त असेल तर या 40 युनिट्सचे बँकिंग होईल आणि जानेवारीमध्ये जर माझ्या पिढीचा वापर 20 युनिट्सपेक्षा कमी असेल, तर 40 युनिट्समधून 20 युनिट्स वजा केले जातील आणि माझे बिल मिळू शकेल. हे बिल तरीही शून्यच प्राप्त होईल.


सबसीडीसाठीच्या पांच सोप्या पायऱ्या:

  1. तुमचे रूफटॉप सोलार संबंधित सगळी कागदपत्रे महाराष्ट्र सरकाच्या वेबसाइट वर अपलोड करणे.वेबसाइटलिंक:https://css.mahadiscom.in/UI/ROOFTOP/PVNewApplication.aspx. याव्यतिरिक्त तुम्ही नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय ह्या पोर्टलवर सुद्धा अॅप्लिकेशन करू शकता: https://solarrooftop.gov.in/ आणि https://www.mahadiscom.in/ismart/

  2. त्यानंतर जिथे रूफटॉप सोलार इंस्टॉल करायचे आहे त्या जागेचा सर्वे करून आवश्यक ती पडताळणी केली जाईल जस की सिस्टम क्षमता, खर्च आणि कार्यप्रदर्शन विश्लेषण.त्यानंतर सोलार इंस्टॉलेशन ची प्रक्रिया चालू करण्यात येईन.

  3. सोलार इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतरचे पुरावे सरकारी ऑफिस मध्ये जाऊन सबमिट करणे किंवा तुम्ही सगळे फोटो आणि पुरावे ऑनलाइन सुद्धा सबमिट करू शकता

  4. इंस्टॉलेशन झाल्यानंतर तुम्ही नेटमिटर साठी अप्लाय करू शकता. नेट मिटरला अप्लाय करण्याच्या पायऱ्या: https://www.frevolt.in/post/how-to-apply-for-a-net-meter-in-maharashtra-for-residential-rooftop-solar

  5. ३० दिवसादरम्यान सबसीडीची रक्कम लाभार्थिच्या बँक अकाऊंट मध्ये जमा करण्यात येईल.

ह्या सगळ्या योजनांचे फायदे घेऊन व पर्यावरणाचे रक्षण करून तुम्ही लाइटबिल शून्य करू शकता.अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना महाराष्ट्र शासन हे फक्त सौरउरजेल पाठिंबा देण्यासाठी अंमलात आणत आहे. तुमच्या एक वेळेच्या गुंतवणुकीचा फायदा तुम्ही ३० वर्षे तर उपभोगू शकताच. आणि शासनाने तुमचं मार्ग अधिकच सहज आणि सोपा करून दिला आहे. तर एक क्षणाचाही विलंब न करता ह्या हरितक्रांतित सहभागी व्हा आणि स्वतचीहि आर्थिक बचत करा.

Komentarze


bottom of page